रोजगार व स्वयंरोजगार

संपूर्ण देशाला रोजगाराच्या समस्येने इतके ग्रासले आहे कि, बेरोजगारांची संख्या मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत चालली आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात बेरोजगाराच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रोजगार मिळेनासे झाल्यामुळे आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोट भरण्यासाठी मनुष्य काहीही व्यवसाय करू लागलेत. अधिकृत जागेवर व्यवसाय करण्याची ऐपत नसल्यामुळे काही लोक अनिधिकृतपणे व्यवसाय करू लागलेत. पोटाची खळगी भरून काही आपले राज्य सोडून शहरामध्ये येवू लागलेत. सर्वात जास्त लोकांनी मुंबई शहर पसंत केले.

लोकांच्या या समस्येला किंवा धडपडीला योग्य दिशा देण्याचं काम मनसेचा रोजगार व स्वयंरोजगार विभाग करत आहे. ह्या विभागाची संधी मला चालून आली आणि एका चांगल्या कार्यात आपला खारीचा वाटा असावा असे वाटू लागले. मुळात माझ्या रक्तातच लोकांना मदत करण्याचा प्रवाह आहे आणि त्याच मुळेच मी इथे आपसुकच ओढलो गेलो कारण हा लोकांच्या पोटाचा प्रश्न आहे. आणि मी ठरवलं कि रोजगार व स्वयंरोजगार हा माझ्या कामाचा मुलभूत प्रश्न असेल. यामध्येच थातूर माथुर उत्तर देऊन उगीच वेळ मारून नेण्यापेक्षा दोन अधिक दोन म्हणजे 'चारच' किंवा 'बाप दाखव अन्यथा श्राद्ध घाल' अशी रोखठोक विचारधारा असलेल्या मा. राजसाहेब ठाकरे सारख्या व्यक्तिमत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि मला पारसाची आठवण झाली. ह्या विभागात काम करताना मला मा. सुनिल बसाखेत्रे यांचे योग्य मार्गदर्शन लाभल्यामुळे पुढे उतुंग काम करून अनेक रोजगार मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन असा निश्चय व्यक्त करतो.

भावी पीढी - उद्याची पिढीच देशाला महासत्ता बनवेल!

आपला देश म्हणजे युवा मनुष्यबळाची सोन्याची खाण आहे. आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. तरीही या मनुष्यबळापैकी कुशल मनुष्यबळाचा विचार करता, आपल्याला बराच मोठा पल्ला गाठावा लागणार आहे.

सध्या देशामध्ये औदयोगिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यात प्रचंड तफावत आहे. एकीकडे बेरोजगारांचे लोंढे, तर दुसरीकडे युवा वर्गाला सक्षम करणारे शिक्षण मिळत नाही. एकविसाव्या शतकाचे आव्हान स्वीकारायचे असेल, तर कुशल मनुष्यबळ मोठ्या संखेने तयार करावे लागेल. आणि हेच आव्हान मी स्वीकारत आहे, मी मला जमेल तसे आजच्या तरुणाला त्याच्या कार्यात मार्गदर्शक म्हणून काम करेन. कारण कुशल मनुष्यबळाची निर्मिती होताच, भारताची विजयी घोडदौड होणे शक्य आहे. परीणामी ही उद्याची पिढीच देशाला महासत्ता बनवेल, यात शंका नाही.

जय हिंद!